Coronavirus Recovery Rate Improved In Mumbai: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला; मुंबई महानगरपालिकेची माहिती
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महानगरपालिकेला (Brihanmumbai Municipal Corporation) यश आले असून दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाची परिस्थितीत सुधारणा होत आहे. मुंबईत कालपर्यंत सकारात्मक रुग्णांचा दैनंदिन सकारात्मकता दर 1.09 होता. मात्र, आज तो आज तो 1.06% वर आला आहे. ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मुंबईतील सकारात्मक रुग्णांचे डबलिंग रेटही 66 दिवसांवर गेला आहे. ज्यामुळे मुंबईतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. धारावीसह दादर आणि माहीम परिसरातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. धारावी सारख्या दाट वस्ती असलेल्या परिसरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्या मुंबई महानगरपालिकेला यश आले आहे. हे देखील वाचा- Mumbai: कूपर रुग्णालयाचा गलथानपणा; महिलेच्या मृत्युच्या 5 दिवसानंतर कोरोना विषाणूची लागण झाल्याचा रिपोर्ट, अंत्यसंस्काराला 200 हून अधिक जणांची उपस्थिती

एएनआयचे ट्वीट-

एकेकाळी मुंबईतील कोरोनाचे अतिसंक्रमित क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे विभाग आता आटोक्यात आल्याचे चित्र आहे. वरळी, वांद्रे, भायखळा, नागपाडा, कुर्ला, माटुंगा, वडाळा, देवनार, मानखुर्द हे भाग आता रुग्णवाढीत सगळ्यात खालच्या क्रमांकावर आले आहेत.