Covid Madat Telemedicine Helpline | | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) बाबत नागरिकांना आपल्या मनात असलेल्या शंका, प्रश्न यांचे निवारण घरबसल्याही करता येणार आहे. कोविड मदत (Covid Madat) उपक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government ) द्वारा ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 09513615550 हा क्रमांक उपलब्ध करुन देत टेलिमेडिसीन हेल्पलाईन (Telemedicine Helpline) सुरू केली आहे.. नागरिकांनी या फोन क्रमांकावर संपर्क करुन आपले प्रश्न विचारायचे आहेत. या प्रश्नांना तज्ज्ञ डॉक्टर उत्तरं देणार आहेत. कोविड 19 (COVID-19) या विषाणूबाबत नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी राज्य सरकारने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

कोविड मदत या हेल्पलाईनवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला राज्यातील कोणत्याही नागरिकाला घेता येणार आहे. ही सुविधा मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तिनही भाषांमध्ये उपलब्ध आहे. राज्यातील नागरिकांसाठी सुरु केलेल्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टरांनी http://bit.ly/covidmadat या संकेतस्थळावर नोंदणी करावी. कोविड विरुद्धच्या या लढ्यात स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे असे राज्य सरकारने अवाहन केले आहे. कोविड मदत या हेल्पलाईनवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

दरम्यान, नागरिकांना या उपक्रमाद्वारे मदत घेताना कोविड मदत या हेल्पलाईनवर विचालेल्या काही विशिष्ट प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. त्यांच्या उत्तरावर आधारित काही मिनिटांतच डॉक्टरांकडून कॉलबॅक येईल. कॉल करणारा कोविड बाधित आहे की त्याला इतर आजार आहेत याबद्दल डॉक्टर चर्चा करणार आहेत. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्रातील COVID-19 संक्रमीत रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; एका क्लिकवर)

ट्विट

ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आकडेवारी आता बरीच वाढली आहे. आज घडीला राज्यात एकूण 3202 इतके कोरोना कोविड 19 संक्रमित रुग्ण आहेत. त्यापैकी 2708 रुग्ण हे प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. तर, 300 रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने आणि बरे वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरस बाधित 194 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.