Coronavirus: महाराष्ट्रातील COVID-19 संक्रमीत रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; एका क्लिकवर

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्रालय प्रत्येक दिवसाची कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी आणि तपशील हा त्या त्या दिवशी सायंकाळी 6 किंवा त्याच दिवशी रात्री उशीरा अद्यावत करत असते. त्यानुसार प्राप्त झालेली अधिकृत आकडेवारी खालील तक्त्यात दिली आहे.

Coronavirus: महाराष्ट्रातील COVID-19 संक्रमीत रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; एका क्लिकवर
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आकडेवारी आता बरीच वाढली आहे. आज घडीला राज्यात एकूण 3202 इतके कोरोना कोविड 19 संक्रमित रुग्ण आहेत. त्यापैकी 2708 रुग्ण हे प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. तर, 300 रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने आणि बरे वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरस बाधित 194 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. दरम्यान, खालील तक्त्यात महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी दिली आहे. जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या किती.

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची इथे दिलेली जिल्हानिहाय आकडेवारी ही 16 एप्रिल 2020 या दिवशी सायंकाळी 6 वाजता अद्ययावत करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्रालय प्रत्येक दिवसाची कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी आणि तपशील हा त्या त्या दिवशी सायंकाळी 6 किंवा त्याच दिवशी रात्री उशीरा अद्यावत करत असते. त्यानुसार प्राप्त झालेली अधिकृत आकडेवारी खालील तक्त्यात दिली आहे. (हेही वाचा, Coronavirus Outbreak in India: भारत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 13000 च्या पार; 437 Covid 19 रुग्णांचा मृत्यू)

कोविड-19 महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती

(*आकडेवारी दि. 16 एप्रिल 2020, सायं 6.00)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 2073 117
2 ठाणे 13 0
3 ठाणे मनपा 109 3
4 नवी मुंबई मनपा 68 3
5 कल्याण डोंबिवली मनपा 50 2
6 उल्हासनगर मनपा 1 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 1 0
8 मीरा भाईंदर 51 2
9 पालघर 5 1
10 वसई विरार मनपा 34 3
11 रायगड 6 0
12 पनवेल मनपा 12 1
  ठाणे मंडळ एकूण 2423 132
1 नाशिक 3 0
2 नाशिक मनपा 5 0
3 मालेगाव मनपा 40 2
4 अहमदनगर 19 1
5 अहमदनगर मनपा 9 0
6 धुळे 1 1
7 धुळे मनपा 0 0
8 जळगाव 0 0
9 जळगाव मनपा 2 1
10 नंदुरबार 0 0
  नाशिक मंडळ एकूण 79 5
1 पुणे 16 0
2 पुणे मनपा 419 44
3 पिंप्री-चिंचवड मनपा 38 1
4 सोलापूर 0 0
5 सोलापूर मनपा 12 1
6 सातारा 7 2
  पुणे मंडळ एकुण 492 48
1 कोल्हापूर 3 0
2 कोल्हापूर मनपा 3 0
3 सांगली 26 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 0 0
5 सिंधुदुर्ग 1 0
6 रत्नागिरी 6 1
  कोल्हापूर मंडळ एकुण 39 1
1 औरंगाबाद 0 0
2 औरंगाबाद मनपा 28 2
3 जालना 2 0
4 हिंगोली 1 0
5 परभणी 0 0
6 परभणी मनपा 1 0
  औरंगाबाद मंडळ एकूण 32 2
1 लातूर 8 0
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 4 0
5 बीड 1 0
6 नांदेड 0 0
7 नांदेड मनपा 0 0
  लातूर मंडळ एकूण 12 0
1 अकोला 7 1
2 अकोला मनपा 7 0
3 अमरावती 0 0
4 अमवरावती मनपा 5 1
5 यवतमाळ 13 0
6 बुलढाणा 21 1
7 वाशीम 1 0
  अकोला मंडळ एकूण 54 3
1 नागपूर 1 0
2 नागपूर मनपा 55 1
3 वर्धा 0 0
4 भंडारा 0 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 0 0
7 चंद्रपूर मनपा 0 0
8 गडचिरोली 0 0
  नागपूर मंडळ एकूण 60 1
  एकूण 3202 194

दरम्यान, महाराष्ट्रासोबतच देशभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. भारतातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 1007 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण 13,387 रुग्ण आहेत. त्यापैकी 11201 रुग्णालयात उपचार घेत आहेत. 1749 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 137 जणांचा मृत्यू झाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2020 09:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).