Maharashtra Police | (Photo Credits: Twitter)

स्वतःच स्वतःचे 'रिमाईंडर' व्हा - मास्क वापरा! असे म्हणत महाराष्ट्र पोलिसांनी ( Maharashtra Police) राज्यातील नागरिकांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी खास व्याकरणाचा आधार घेतला आहे. होय, महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक मेसेज पोस्ट केला आहे. यात नागरिकांना जबाबदारीची जाणीव करुन दिली आहे. या आधीही महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन हटके संदेश देत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला ट्विटर युजर्सकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

व्याकरणाचा आणि वाक्यरचणेचा आधार घेत महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वाक्यातील चूक दुरुस्त केली जाऊ शकते, कृतीतील नाही. स्वतःच स्वतःचे 'रिमाईंडर' व्हा - मास्क वापरा!. हा संदेश देताना सोबत #Coranavirus हा हॅशटॅगही वापरला आहे.

राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. अर्थात उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. मात्र, असे असले तरी कोरोना व्हायरस संक्रमित मृतांचा आकडा चटका लावणारा आहे. त्यामुळे राज्य सरकार ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रत्न करत आहे. अशात महाराष्ट्र पोलीसही जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. (हेही वाचा, Lockdown: बाहेर जातो नाही, घरी येतो म्हणा: महाराष्ट्र पोलीस)

दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2,11,987 इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत राज्यात कोरोना व्हायरस संसर्गामुळे 9,026 जणांचा बळी गेला आहे. राज्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 54.37 टक्के आहे.