कोरोना व्हायरसचा (Coronavirus) दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवल्या जाणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ज्यांचे हातावर पोट असलेल्या लोकांचे हाल होत आहेत. याच परिस्थितीत बहुसंख्येने कामगार वर्गाने आपल्या घरचा रस्ता पकडला असून ते पायी चालत जात आहेत. परंतु सरकारने या लोकांना स्थलांतर करण्यासाठी मनाई केली असून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थेसोबत राहण्याची सोय करुन दिली आहे. याच पार्श्वभुमीवर नागपूर (Nagpur) येथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच गरजूंना जे काही खाण्याचे दिले जाते त्यावर दिवस पुढे ढकलावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नागपूरातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना लॉकडाउनच्या काळात जगणे मुश्किल झाले आहे. तर हातावर पोट असल्याने स्वत: च्या आणि कुटूंबाच्या रोजच्या गरजा भागविण्यात अडचणी येत आहेत. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेने याबाबत अधिक स्पष्टीकरत देत असे म्हटले आहे की, आमच्याकडे काहीच खाण्यासाठी नाही आहे. त्यामुळे आमच्यासारख्या गरजू लोकांना अन्न पुरवणाऱ्यांवर आम्ही अवलंबून आहोत.(Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टाळी, थाळी व दिवाळी कार्यक्रम दुर्दैवी - पृथ्वीराज चव्हाण)
Maharashtra: Sex workers in Nagpur are facing difficulty in meeting day-to-day needs of themselves and their families amid #CoronavirusLockdown. One of the workers says,"We have nothing to eat. We are dependent on those who are providing food for needy people like us". pic.twitter.com/HBsDHbwziX
— ANI (@ANI) April 4, 2020
दरम्यान, लॉकडाउनच्या काळात विविध स्तरातून मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये बड्या उद्योगपती ते सामान्य व्यक्ती आपल्या परीने आर्थिक मदत करत आहेत. ऐवढेच नाही तर रस्त्यावर सफाई कामगारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांना सॅनिटायझर आणि मास्क पुरवले जात आहेत. राज्यातील आता नवे कोरोना व्हायरसचे 47 रुग्ण आढळून आल्याने आकडा 537 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.