Coronavirus | File Image | (Photo Credits: PTI)

Coronavirus: देशभरासह राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णांचा आकडा वाढत असल्याने काही ठिकाणी लॉकडाऊन आणि संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे. अशातच आता कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुद्धा विकेड्ला निर्बंध लागू करण्यात आले आहेत.केडीएमसी कडून वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे शनिवार-रविवारी निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम असणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार, अत्यावश्यक सेवासुविधा वगळता अन्य आस्थापने बंद राहणार आहेत. तर रेस्टॉरंट मालकांनी नागरिकांना फक्त पार्सलची सेवा द्यावी अशा सुचना सुद्धा दिल्या आहेत.

तसेच भाजीमार्केटमधील फक्त 50 टक्के दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. दरम्यान कल्याण-डोंबिवली मध्ये शुक्रवारी 800 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला  392 जणांची प्रकृती सुधारली असल्याने एकूण 66,323 जणांनी कोरोनावर मात केली आहे.(Night Curfew In Maharashtra: महाराष्ट्रात रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत मॉल बंद- मुख्यमंत्री कार्यालय)

Tweet:

राज्यात गेल्या 24 तासात 36,902 जणांना कोरोनाची लागण झाली असून 17,019 जणांना डिस्चार्ज दिला गेला. तर 112 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल आहे. त्यामुळे आता राज्यात एकूण 26,37,735 कोरोनाचे रुग्ण असून 23,00,056 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच एकूण 53,907 जणांचा बळी गेला आणि आता 2,82,451 अॅक्टिव्ह रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे.