
आज बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमधील कोरोना विषाणू रुग्णांची संख्या 1,854 इतकी आहे. आय सी एम आर पोर्टल अद्ययावत झाल्यामुळे कालची उर्वरित वाधित रुग्णांची संख्या आजच्या अहवालात अंतर्भूत करण्यात आली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,39,532 वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये कोरोनाचे 776 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,12,743 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोनाच्या 18,977 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये 28 रुग्णांचा मृत्यू झाला, यासह मुंबईमधील एकूण कोरोन रुग्ण मृत्यूंची संख्या 7,502 इतकी झाली आहे.
आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 22 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 19 रुग्ण पुरुष व 9 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 22 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 6 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.75 टक्के झाला आहे. 25 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 7,25,519 इतक्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर आता 93 दिवस झाला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 14,888 नवे रुग्ण, 295 जणांचा मृत्यू)
बीएमसी ट्वीट -
26-Aug, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/q03eKnJ1mX
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 26, 2020
दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज महत्वाचे निर्णय घेत, सरकार ने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (#MPSC) सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यासह राज्य सरकारने सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणारे वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना, दि. 1.एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत वाहन करमाफी (Vehicle Tax Exemption) देण्याचा निर्णय घेतला आहे.