Coronavirus: महाराष्ट्रात आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 14,888  नवे रुग्ण, 295 जणांचा मृत्यू
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

राज्यात (Maharashtra) आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus) 14,888 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 295 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित एकूण रुग्णांची संख्या आता 7,18,711 इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या 5,22,427 आणि रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या 1,72,873 जाणांचाही समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने (Maharashtra State Health Department) ही माहिती दिली आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबई शहरात आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 1,854 रुग्णांची नोंद झाली. तर 776 जणांना डिस्चार्ज देण्यात आली. मुंबईत आज दिवसभरात 28 जणांचा कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या आता 1,39,532 इतकी झाली आहे. यात प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 18,977 रुग्णांसह डिस्चार्ज मिलालेल्या 1,12,743 आणि मृत्यू झालेल्या 7,502 जणांचाही समावेश आहे.

दरम्यान, देशातील एकूण कोरना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या संख्येबाबत बोलायचे तर, देशातील कोरना रुग्णांची एकूण संख्या 3234475 इतकी आहे. त्यापैकी प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 707267 इतकी आहे. तर आतापर्यंत 2467759 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आणि 59449 जणांचा मृत्यू झाला आहे.