Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. त्यामुळे सरकारकडून चिंता व्यक्त करण्यात येत असून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्रात गेल्या 24 तासात आणखी 8641 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 266 जणांचा बळी गेला आहे. तर राज्यात सध्या 1,14,648 अॅक्टिव्ह रुग्ण असून एकूण 11,194 जणांचा बळी गेला आहे. तसेच 1,58,140 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत सर्वाधिक म्हणजेच 97,950 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. तसेच कोविड वॉरिअर्स सुद्धा कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. तर नागरिकांनी सुद्धा कोरोनाच्या काळात स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.(मातामृत्यू दर कमी करण्यात महाराष्ट्राला मोठे यश; देशात केरळ नंतर राज्याचा दुसरा क्रमांक)

राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात ही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कायदेशीर ही कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यातील विविध ठिकाणी कोविड आणि क्वारंटाइन सेंटर्स सुद्धा उभारण्यात आले आहेत.