Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

भारतामध्ये कोरोना विळखा आता अधिकच घट्ट होत आहे. देशात काही दिवसांपूर्वी झालेल्या तबलिगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये हजारो लोक एकत्र आली आणि त्यांच्या मूळ घरी परत गेली. दरम्यान आता या लोकांना शोधून त्यांची कोरोना चाचणी सोबतच त्यांच्या संपर्कामध्ये आलेले लोकं तपासण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे. आज राजस्थान सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 14 नवे रूग्ण कोव्हिड 19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये 6 महाराष्ट्रातील नागरिकांचा सहभाग आहे. सध्या राजस्थानमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 154 वर पोहचला आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1400 जण महाराष्ट्रातून मरकजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते त्यापैकी सुमारे 1300 लोकांचा संपर्क झाला आहे. उर्वरित भाविकांना शोधण्याचं काम सुरू आहे. Coronavirus: तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले महाराष्ट्रातील 1300 जण क्वारंटाइन- राजेश टोपे.  

भारतामध्ये कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी आहे. राज्यात 400 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. मुंबई शहरात धारावी, वरळी कोळीवाडा या भागात कोरोनाचा प्रभाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून भाग सील करण्यात आला आहे. देशामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 2301 पर्यंत आज पोहचला आहे. त्यापैकी 156 जण कोरोनामुक्त झाल्याने घरी गेले आहेत तर 56 जण दगावले आहेत.

ANI Tweet

तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्यांपैकी महाराष्ट्रात रत्नागिरी, औरंगाबाद, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या भागात काही भाविकांचा पत्ता लागला आहे. सध्या या सार्‍यांना सोबतच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटीन करण्यात आले आहे.