Coronavirus: महाराष्ट्र पोलीस दलाला दिलासा, गेल्या 24 तासात केवळ एकच कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह; एकूण संक्रमितांची संख्या 2,557
Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील एकूण 2,557 कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमन झाले आहेत. दिलासादायक बाब अशी की गेल्या 24 तासात केवळ एका पोलीस कर्मचाऱ्यांची कोविड 19 चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. मात्र, एका कोरोना व्हायरस (COVID-19) पॉझिटीव्ह पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचविण्यास यश आले नाही. त्यामुळे गेल्या चोवीस तासात एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ताज्या माहितीनुसार आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस दलातील कोरोना संक्रमित एकूण 30 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना संक्रमित 2,557 पोलिस कर्मचाऱ्यांपैकी 1510 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहत. यात 191 पोलीस अधिकाऱ्यांचा आणि 1319 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत एकूण 30 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात 1 अधिकारी आणि 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितनुसार, आतापर्यंत 1001138 नागरिकांनी होल्पलाईन क्रमांक 100 वर फोन करुन पोलिसांकडे कोरना व्हायरस संदर्भात मदत मागितली आहे. (हेही वाचा, Heart Surgery: मुंबई पोलीस कॉन्स्टेबल आकाश गायकवाड यांनी रक्तदान करुन तिच्याशी जोडले रक्ताचे नाते)

एएनआय ट्विट

महाराष्ट्रातील एकूण कोरोना व्हायरस स्थितीबाबत सांगायचे तर राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा आतापर्यंतचा एकूण आकडा 74860 वर पोहोचला आहे. त्यातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 39935 इतकी आहे. उपचार घेऊन पृकती सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने रुग्णलायतून सुटी (डिस्चार्ज) मिळालेल्यांची संख्या 32329 इतकी आहे. राज्यात आतापर्यंत 2587 जणांचा कोरोना व्हायरस संक्रमितांचा मृत्यू झाला आहे.