Coronavirus: WhatsApp वापरकर्त्यांसाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून COVID-19 साथीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जारी
Advisory for WhatsApp Users by Maharashtra Cyber | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Advisory for WhatsApp Users by Maharashtra Cyber: अवघे जग COVID-19 म्हणजेच कोरोना व्हायरस (Coronavirus) या साथीच्या आजाराने ग्रासले आहे. भारत आणि महाराष्ट्रातही हा साथीचा आजार आपला प्रादूर्भाव वाढवत आहे. अशा स्थितीत संपूर्ण देश लॉकडाऊन करुन योग्य ती घबरदारी घेतली जात आहे. असे असताना काही महाभाग मात्र सोशल मीडियाचा वापर करत या गंभीर आजाराबाबत दिशाभूल करणारे संदेश, अफवा अथवा चुकीची माहिती पसरवत आहेत. याची गांभीर्याने नोंद घेत महाराष्ट्र पोलीस सायबर (Maharashtra Cyber) विभाग सतर्क झाला आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने एक मार्गदर्शक नियमावलीच जारी केली आहे. खास करुन ही मार्गदर्शक नियमावली ही WhatsApp युजर्ससाठी आहेत.

काय आहे मार्गदर्शक नियमावलीत?

  • फेक न्यूज, धार्मिक तेड निर्माण करणारे संदेश, दिशाभूल करणारी माहिती सोशल पसरवू नका.
  • तुम्हाला आलेली फेक न्यूज, धार्मिक तेड निर्माण करणारे संदेश, दिशाभूल करणारी माहिती पुढे पाठवू (फॉर्वर्ड) करु नका.
  • तुम्हास आलेली आक्षेपार्ह माहिती, संदेश, बातमी तत्काळ डिलिट करा. पुढे पाठवू नका. ग्रुप अॅडमीनने दिलेल्या सूचना, निर्देशांचे पालन करा.
  • प्राप्त झालेला कोणताही संदेश, छायाचित्र, प्रतिमा, व्हिडओ, बातमी, माहिती आदिंचा स्त्रोत तपासा.

    तुम्हाला प्राप्त झालेल्या कोणत्याही संदेश, छायाचित्र, प्रतिमा, व्हिडओ, बातमी, माहिती याबाबात

  • आक्षेप असेन तर त्याची माहिती देण्यासाठी www.cybercrime.gov.in या संकेतस्थळासाठी संपर्क करा. अथवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करा.
  • कोणत्याही प्रकारे हिंसक प्रतिमा, संदेश व्हिडिओ, अश्लिल सामग्री (पॉर्न), भावना दुखावणारा संदेश पुढे पाठवू नका.

महाराष्ट्र सायबर विभागाने दिलेल्या निर्देशांची नियमावली पीडिएफ रुपात पाहण्यासाठी इथे क्लिक करा. (हेही वाचा, Coronavirus: मुंबई पोलिसांनी 'आम्ही घरी असतो तर काय केले असते' हे सांगत शेअर केला भावनिक व्हिडिओ, Must Watch)

ग्रूप अॅडमीनसाठी सूचना

  • ग्रुपमध्ये व्यक्त केल्या जाणाऱ्या आषयाबाबत ग्रुप अॅडमीन जबाबदार असेन. आपल्या ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारे चुकीचा, अफवा पसरवणार, अश्लिल अथवा दिशाभूल करणारा संदेश जाणार नाही याची काळजी ग्रुप अॅडमीनने घ्यावी.
  • नियम, अटी आणि सूचना याची ग्रूपमधील सदस्यांना जाणीव करुन द्या.
  • एखाद्या सदस्याने संदेश, छायाचित्र, प्रतिमा, व्हिडओ, बातमी, माहिती ग्रुपवर शेअर केल्यास वेळीच त्याला समज द्या. तो आशय ग्रुपवरुन काढून टाका.
  • ग्रुपवर कार्यरत राहा. माहितीची सत्यता तपासा.
  • अतिमहत्त्वाचा संदेश देण्यासाठी आणि ग्रुपमधील सदस्यांकडून चुकीची माहिती टाळण्यासाठी ग्रुपवर संदेश पाठवण्याचे अधिकार केवळ ग्रुप अॅडमीनकडेच ठेवा.
  • ग्रुपमधील एखाद्या सदस्याने आक्षेपार्ग आशय शेअर केला असता पोलिसांशी तत्काळ संपर्क करा.

दरम्यान, कायदेशीर कारवाई पासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर सोशल मीडियावर वरील संदेशाचे पालन करा. अथवा कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 153 (अ), 153 (ब), 295 (अ) अन्वये कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र सायबर सेलने दिला आहे.