Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसला (Coronavirus) देशातून पळवून लावण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. तरीसुद्धा हा व्हायरस दिवसेंदिवस महाराष्ट्रातील, मुंबईतील पाळंमुळं मजबूत करु लागलाय याचा अंदाज कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येवर पाहिला की येईल. याला कारणीभूत ठरतोय तो लोकांचा बेजबाबदारपणा. वारंवावर प्रशासनाकडून सांगूनही लोक घराबाहेर पडत आहेत. विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. त्यामुळे अशा लोकांना समज देण्यासाठी आणि या विषाणूचा प्रसार न होऊ देण्यासाठी देशभरातील पोलिस यंत्रणा 24 तास कामाला लागली आहेत. यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागत आहे. त्यामुळे या लोकांना आपल्या परिस्थितीचे दर्शन घडविण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक सुंदर आणि भावनिक संदेश देणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस तैनात असलेल्या मुंबई पोलिसांनी जर आम्ही घरी असतो तर काय केले असते या प्रश्नाचे उत्तर दिले आहे जे ऐकून तुमचेही डोळे पाणावतील.

Watch Video:

हेदेखील वाचा- मुंबई: सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून न फिरणा-यांवर कलम 188 अंतर्गत होणार कारवाई- BMC

यात प्रत्येकाने जर मला असा वेळ मिळाला असता तर मी माझ्या कुटूंबासोबत, मुलांसोबत वेळ घालवला असता अशी प्रांजळ उत्तर या मुंबई पोलिसांनी दिली आहेत. थोडक्यात 'आज तुमच्यासाठी आम्हाला जर घराबाहेर पडावे लागत आहे, घरापासून दूर राहावे लागत आहे, तर तुम्हीही आमचा विचार करुन कृपया घराबाहेर पडू नका. जसं तुम्हाला कुटूंब आहे तसं आम्हालाही आहे' असा साधासरळ संदेश मुंबई पोलिसांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.

या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी घराबाहेर न पडणे हा एकच पर्याय आहे. त्यामुळे नियमांचे पालन करा, घराबाहेर पडू नका असे मुंबई पोलिसांनी चांगला संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.