Coronavirus in India (Photo Credits: IANS)

लॉकडाऊन असतानाही लोक सर्रासपणे घराबाहेर फिरताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचे महाराष्ट्रातील भीषण रुप अजून अनेकांच्या पथ्यांवर पडले नसावे कदाचित. इतकेच नाही तर मास्क घालून फिरण्याचेही हे लोक तसदी घेत नाही आहे. म्हणून मुंबई महानगरपालिकेने कठोर पावलं उचलत आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालून फिरणा-यांवर IPC कलम 188 च्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी ताबडतोब करण्यात यावी असेही BMC सांगितले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारनेही मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे महानगर प्रदेशांतर्गत येणा-या सरकारी कार्यालयात प्रवेश करताना मास्क घालणे बंधनकारक केले आहे.

COVID-19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नका असे वारंवार सांगत असताना देखील नागरिक प्रशासनांच्या नियमांचे उल्लंघन करुन सर्रासपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यात मास्क न घालून फिरणारे लोकही मुंबईत मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. म्हणून मुंबईत कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आता मास्क न घालणा-यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे BMC ने सांगितले आहे.

COVID-19: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण, नवी मुंबई, मीरा भाईंदर मधील मेडिकल्स वगळता सर्व दुकाने 5 नंतर राहणार बंद

सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, प्रवास करताना हे मास्क घालणे बंधनकारक राहिल. त्याचबरोबर रुग्णालय, बाजार, ऑफिसेस (जी सुरु आहेत ती) मध्येही मास्क घालणे बंधनकारक आहे. कारण कोणतेही असो सार्वजनिक जागेवर मास्क घालून फिरणे बंधनकारक असल्याचे BMC ने काढलेल्या या परिपत्रकात म्हटले आहे.

Coronavirus Mumbai: भाभा हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांची निदर्शने; कमी दर्जाचे संरक्षण कीट दिल्याचा आरोप : Watch Video

महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढतच आहे. आज घडीला, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत 60 ने वाढ झाली असून राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 1078 वर पोहचला आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यातील 44 नवे रुग्ण आढळले आहेत. तर पुणे येथे 9, नागपुर मध्ये 4, आणि अहमदनगर, अकोला, बुलढाणा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहेत.