Police| (Photo Credits: Maharashtra Police Twitter)

कोरोना व्हायरस संकटामध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्ष असलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) भोवती कोरोनाचा विळखा आता अधिक घट्ट होत आहे. दरम्यान आज 24 तासामध्ये महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाची बाधा होण्यामध्ये मोठी झाल्याचं चित्र आहे. दरम्यान महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिवसभरामध्ये राज्यात 131 पोलिस कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus)  लागण झाली आहे. तर दुर्देवाने 2 पोलिस कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधित पोलिस कर्मचार्‍यांचा आकडा 2095 पर्यंत पोहचला आहे. त्यापैकी 1178 जणांवर उपचार सुरू असून 897 जणांनी कोरोना विरूद्धची लढाई जिंकली आहे. तर एकूण 22 पोलिस कोविड योद्धांनी आपले प्राण गमावले आहेत. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करुन सैन्य तैनात करण्यात येणार असल्याची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार- गृहमंत्री अनिल देशमुख.

महाराष्ट्रामध्ये 24 मार्चपासून कोरोना व्हायरस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत आहे. पण या लॉकडाऊनामध्ये नियमांची पायमल्ली होणार नाही याकडे लक्ष देण्यासाठी ठिकठिकाणी महाराष्ट्र पोलिस तैनात आहेत. मात्र अहोरात्र दोन महिन्यांपेक्षा अधिक काम करणार्‍या पोलिसांवर आता ताण आला आहे. काही दिवसांपूर्वी हा ताण कमी करण्यासाठी राज्यातील कोरोना हॉटस्पॉट्स असलेल्या भागात महाराष्ट्र पोलिसांच्या सोबतीने केंद्राचे निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून आता 50 वर्षावरील आणि मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना बंदोबस्ताच्या ड्युटीपासून दूर ठेवण्यात आले आहेत. COVID 19 ने दगावलेल्या मुंबई पोलिस कर्मचार्‍याला कुटुंबाला मिळणार 65 लाखाची मदत.  

ANI Tweet 

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेले राज्य आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अकोला या महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमानावर आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा काल रात्री पर्यंत 56 हजार 948 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 17 हजार 918 जणांनी कोरोनावर मात केली आहे.