मुंबईमध्ये दिवसागणिक कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाच्या विळख्यातून मुंबई पोलिस देखील सुटू शकलेले नाहीत. मुंबई पोलिसाचा कोरोना मुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आता 65 लाखाची मदत केली जाणार आहे. दरम्यान यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून 50 लाख रूपये आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, Mumbai Police Foundation कडून 10 लाखाची मदत आणि खाजगी बॅंक इन्श्युरंस कडून 5 लाखाचा विमा असं स्वरूप असेल. हा निर्णय मुंबई पोलिस कमिशनर परम बीर सिंग आणि डीसीपी प्रणय अशोक यांनी घेतला आहे.
मुंबई शहरामध्ये 600 पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यापिकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात एकूण 12 पोलिस कर्मचार्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित पोलिस कर्मचारी मुंबई शहरामध्ये आहेत. महाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये 1388 कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात 12 जणांचा मृत्यू.
दरम्यान 2018 साली MPF ची सुरूवात केली आहे. यामध्ये पोलिस कर्मचार्यांसाठी सामान्य व्यक्ती, व्यावसायिक, कलाकार मंडळी, सेलिब्रिटी यांच्यासाठी दान दिले जाते. दरम्यान आता कोरोनामुळे दगावलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे. जॉईन पोलिस कमिशनर नवल बजाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाला 48 तासामध्ये आर्थिक मदत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मागील काही दिवसांमध्ये धारवीत 32 वर्षीय अमोल कुलकर्णी हा तरूण पोलिस कर्मचारी गमावल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान आता पोलिसांना दीड - 2 महिन्याच्या सततच्या बंदोबस्ताच्या ड्युटीमधून आराम मिळावा म्हणून केंद्रातून काही सुरक्षा जवानांच्या तुकड्या बोलवून तैनात करण्यात आल्या आहेत. यामुळे काही काळ पोलिसांना आराम देण्यास वेळ मिळेल.