महाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये 1388 कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात 12 जणांचा मृत्यू
Maharashtra Police | (File Photo)

आज महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) खात्याने दिलेल्या माहितीनुसार 1388 महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यात 948 जणांवर उपचार सुरू असून 428 पोलिसांनी या आजारावर मात देखील केली आहे. मागील दोन महिन्यांपासून भारतामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊन आहे. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिस कर्मचारी अहोरात्र मेहनत करत आहेत. अशामध्ये बंदोबस्ताच्या ड्युटीपासून क्वारंटीन सेंटर ते नाक्यानाक्यावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या विळख्यात आता पोलिस कर्मचारी देखील आले आहे. Coronavirus: कोरोना व्हायरस विरुद्धचा लढा यशस्वी जिंकल्यावर महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्याने सांगितला अनुभव (Video).

महाराष्ट्र पोलिस खात्याने कोरोनचा वाढता धोका पाहता 50 वर्षावरील पोलिस कर्मचार्‍यांना बंदोबस्ताची ड्युटी न देता घरीच बसण्याचे आदेश दिले आहे. यासोबतच कर्करोग, उच्च रक्तदाब,हृद्यविकार, मधुमेह असलेल्यांनाही कोरोनाचा अधिक धोका असल्याने त्यांना लांब ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान मागील दीड ते 2 महिन्यांचा पोलिसांवरील ताण लक्षात घेता आता केंद्राचे सुरक्षा दलाचे जवान महाराष्ट्रात काम करण्यास सज्ज झाले आहेत. मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक, औरंगाबाद अशा कोरोना हॉटस्पॉट अधिक असलेल्या ठिकाणी केंद्राचे जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

ANI Tweet 

दरम्यान भारतासह महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये लाक्षणिक वाढ बघायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 37 हजाराच्या पार गेला आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक रूग्ण पहायला मिळत आहेत. त्यामुळे आता मुंबई पालिका प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलिस यांच्यावरील ताणदेखील वाढला आहे.