Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

पालघरमध्ये (Palghar) आज आणखीन एका नर्सला (Nurse) कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. ही महिला पालघरच्या पूर्व भागातली रहिवासी आहे. ती मुंबई च्या के.ई. एम रुग्णालयात (KEM Hospital) नर्स म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्रात शनिवारी 1165 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 20 हजार 228 वर पोहोचली आहे.

दरम्यान, भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील 24 तासांत देशात 3277 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 127 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. सध्या भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 62,939 वर पोहोचली आहे. यात 41,472 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 19,358 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. देशात आतापर्यंत एकूण 2109 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. (हेही वाचा - Coronavirus: महाराष्ट्र पोलीस दलातील 786 कर्मचारी COVID-19 पॉझिटीव्ह; 88 अधिकाऱ्यांसह 698 पोलिसांचा समावेश)

महाराष्ट्रात अनेक डॉक्टर्स तसेच नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह एकूण 786 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 703 पोलिसांवर रुग्णालात उपचार सुरु आहेत. यातील 76 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. परंतु, दुर्दैवाने 7 पोलिसांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.