चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. भारतात कोरोनामुळे गेल्या 24 तासांत एकाच दिवशी हजारो लोकांचा मृत्यू झाला असताना पुण्यातून (Pune) सर्वांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाने अवघ्या 15 दिवसांत एकाच कुटुंबियातील 5 जणांचा बळी घेतला आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील जाधव कुटुंबियांनी आपल्या घरात पुजेचे आयोजन केले होते. या पूजेला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला आमंत्रित करण्यात आले नव्हते. महत्वाचे म्हणजे, या पूजेला केवळ घरातील सदस्यच येणार असल्याने त्यांना कोरोनाचा धोका वाटला नाही. परंतु, पुजेनंतर आपापल्या घरी निघून गेल्यानंतर आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड या सर्वांनाच कोरोनाचा संसर्ग झाला. दरम्यान, हळहळू त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांमध्ये 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Mumbai Police: मुंबईत आता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांसाठी कलर कोड; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची घोषणा
महाराष्ट्रात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होऊ लागली आहे. राज्यात आज तब्बल 67 हजार 123 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर, 419 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 30 लाख 61 हजार 174 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 59 लाख 970 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 6 लाख 47 हजार 933 रुग्ण सक्रीय आहेत.