Mumbai Police: मुंबईत आता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांसाठी कलर कोड; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची घोषणा
Hemant Nagrale (Photo Credit: ANI)

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवांना (Essential Services) परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मुंबईत (Mumbai) अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक गाड्या रस्त्यावर फिरत आहेत. याचपार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गांड्यासाठी कलर कोड देण्यात येणार आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराच मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी नागरिकांना दिला आहे.

राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईच्या विनाकारण घराबाहेर पडून आणि कोंडी करणाऱ्या मुंबईकरांवर आता पोलिस कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. मुंबईत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी कलरकोडचा उपाय अंमलात आणण्याचे ठरवले आहे. दरम्यान, कलरकोडचा गैरवापर केल्यास 419 कलमाखाली गुन्हा दाखल करणार येणार आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या, राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई पोलिसांचे ट्वीट-

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांना लाल रंग देण्यात आला आहे. याचबरोबर भाजीपालाच्या गाडीसाठी हिरवा रंग आणि इतर अत्यावश्यक सेवेसाठी पिवळा रंग ठरवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांवर 6 इंच गोल सर्कल लावण्याच्या सूचना पोलीस आयुक्त यांनी दिल्या आहेत.