Uddhav Thackeray | (Photo Credit - X)

Congress Rejects Uddhav Sena's Seat Demand: उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Sena) काँग्रेस (Congress) कडून मोठा झटका बसला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Elections 2024) महाराष्ट्रात 23 जागांची शिवसेनेची (UBT) मित्रपक्षाची मागणी काँग्रेसने फेटाळली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र विकास आघाडी भागीदार शिवसेना (UBT), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा करण्यासाठी नेत्यांनी भेट घेतल्यानंतर हा काँग्रेसने उद्धव गट शिवसेनेच्या 23 जागांची मागणी फेटाळली.

दरम्यान, शिवसेनेचे दोन गटात विभाजन झाल्यानंतर यूबीटी शिवसेना गटाने 23 जागांवर दावा केला आहे. पक्षाच्या विभाजनामुळे शिवसेनेकडे पुरेसे उमेदवार नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटासमोर मोठे आव्हान आहे. (हेही वाचा -Raj Thackeray मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह 'वर्षा' वर CM Eknath Shinde यांच्या भेटीला; वर्षभरातील सहावी भेट)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत काँग्रेस प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर राज्यात स्थिर मतांचा काँग्रेस हा एकमेव मोठा जुना पक्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले की, पक्षांमध्ये समायोजनाची गरज आहे. प्रत्येक पक्षाला जास्त जागांची इच्छा असली तरी, शिवसेनेची 23 जागांची मागणी सध्याच्या परिस्थितीनुसार जास्त आहे. (हेही वाचा -Lok Sabha Elections 2024: 'शिंदे गटाला जितक्या जागा, तितक्याच आम्हाला पण हव्या'; Ajit Pawar गटाची मागणी)

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सांगितले की, नेत्यांनी जागा जिंकण्यावरून संघर्ष टाळावा. शिवसेना 23 जागांची मागणी करू शकते, पण त्यांचे काय करणार? उमेदवार नसणे ही शिवसेनेसाठी अडचण आहे.