Raj Thackeray मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह 'वर्षा' वर CM Eknath Shinde यांच्या भेटीला; वर्षभरातील सहावी भेट
Raj Thackeray With CM | Twitter

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीला 'वर्षा' वर पोहचले आहेत. राज ठाकरेंसोबत (Raj Thackeray) त्यांचे विश्वासू बाळा नांदगावकरही (Bala Nanadgaokar) आहेत. रिपोर्ट्सनुसार, राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुर्नविकास, राम मंदिर, मुंबईतील विविध विकासकामं आणि कल्याण डोंबिवलीच्या विषयांवर चर्चा केली आहे. मागील काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि शिंदे यांची वरचेवर भेट होत आहे. 2 डिसेंबरला देखील या दोघांची भेट झाली होती.

आगामी निवडणूकांचा काळ पाहता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना देखील सुरूवात झाली आहे. आजच्या बैठकीत राज ठाकरेंनी काही मागण्या समोर ठेवल्याचंही वृत्त आहे. या भेटी दरम्यान काही विषयांवर चर्चा झाल्याची माहिती देखील बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. नक्की वाचा: मुंबईतील मोठा प्रकल्प Adani Group कडेच का? Raj Thackeray यांचा सवाल; 'मविआ'च्या मोर्चा वर टीपण्णी .

आज दुपारी 12 वाजता राज ठाकरे वर्षा बंगल्यावर आले. त्यांनी अर्धा तासापेक्षा अधिक वेळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांची ही या वर्षातील सहावी भेट आहे.

राम मंदिराच्या निमंत्रितांमध्ये समावेश ?

राज ठाकरेंना राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण येत्या 1-2 दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. अयोद्धेला 22 जानेवारीला राम मंदिरात रामलाल्ल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे. त्यामध्ये देशभरातील मान्यवरांना सह्भागी होण्यासाठी निमंत्रण दिलं जात आहे.