Maha Vikas Aghadi: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे मोठ वक्तव्य
Yashomati Thakur, Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter, PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) भाजपसोबत युती तोडल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत हात मिळवणी करून राज्यात महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) स्थापना केली. परंतु, हे तिन्ही पक्ष भिन्न विचाराचे असून यांच्यातील युती जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मतभेद सुरु झाली होती. यामुळे विरोधकांचे भाकीत खरे ठरते की काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. यातच महाराष्ट्राच्या महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याचा गाडा हाकणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

यशोमती ठाकूर यांनी पुण्यातील देहू येथे आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. दरम्यान त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. उद्धव ठाकरे हे व्यापक विचाराचे असून अतिशय चांगले नेतृत्व आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच सरकार चालवत असताना छोट्या-मोठ्या अडचणी येत असतात. त्याला आम्ही घाबरत नाही. आम्ही अतिशय स्थिर आहोत. आमच्यामध्ये सातत्य आहे, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- Shiv Sena Meeting: शिवसेना आमदार, खासदार बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आदेश

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत त्यांना विचारणा केली असता यावर बोलण्यास त्यांनी टाळले. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले आहे, त्याचप्रमाणे चौकशी सुरु आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणावर बोलता येईल, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.