Ashok Chavan On Devendra Fadnavis: डॉ. मनमोहनसिंग यांचे आपल्या मंत्रिमंडळावर नियंत्रण नसल्याने देश रसातळाला गेल्याचा बिनबुडाचा आरोप करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मागील साडेसहा वर्षांपासून मंत्रिमंडळावर हुकमी वर्चस्व असलेल्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यकाळात देशाची कशी वाताहत झाली, याचे आत्मचिंतन केले पाहिजे, असा सल्ला काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी फडणवीसांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी डॉ. मनमोहन सिंहांच्या काळात देश रसातळाला गेल्याची टीका केली होती. आज अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यूत्तर दिलं आहे. (हेही वाचा -Devendra Fadnavis Claim: शिवसेनेसोबत युती करुन चूक केली, नाहीतर भाजपला 150 जागा मिळाल्या असत्या: देवेंद्र फडणवीस)
डॉ. मनमोहनसिंग यांचे आपल्या मंत्रिमंडळावर नियंत्रण नसल्याने देश रसातळाला गेल्याचा बिनबुडाचा आरोप करण्याऐवजी @Dev_Fadnavis यांनी मागील साडेसहा वर्षांपासून मंत्रिमंडळावर हुकमी वर्चस्व असलेल्या @narendramodi यांच्या कार्यकाळात देशाची कशी वाताहत झाली, याचे आत्मचिंतन केले पाहिजे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 19, 2020
दरम्यान, शुक्रवारी भाजपच्या सेवा सप्ताह कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, 'देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंहांच्या काळात देश रसातळाला गेला. मनमोहन सिंह सज्जन व्यक्ती होते. मात्र त्यांचं सरकारवर काहीही नियंत्रण नव्हतं. त्यावेळी प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होता. मात्र, पंतप्रधान स्वत:ला पंतप्रधान समजत नव्हते, असंही फडणवीस म्हणाले होते.