
शिवसेना (Shiv Sena) पक्षासोबत युती केली नसती तर विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Election 2019) मध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) स्वबळावर 150 पेक्षाही अधिक जागा सहज मिळवू शकला असता, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. तसेच, या निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युती केली ही एकच गोष्ट चुकली, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपने 'सेवा सप्ताह' म्हणून साजरा केला. या वेळी फडणवीस एका व्हर्च्युअल रॅलीत बोलत होते. फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या राजकीय विश्लेशणाचा दाखला देत हे विधान केले.
देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले की, भाऊ तोरसेकर यांनी 2013 मध्येच सांगितले होते की, भारतीय जनता पक्षाने जर लोकसभा निवडणूक 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पादाचा उमेदवार म्हणून निवडले तर, भाजप हा जवळपास 172 पेक्षाही अधिक जागा मिळवू शकेल. त्यावेळी अनेकांनी भाऊ तोरसेकर यांच्या दाव्याची खिल्ली उडवली. अनेकांना वाटलं ते काहीसे अधिकचेच सांगत आहेत. परंतू, ते सत्यात उतरलं.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणूक 2019 मध्येही आपण दिल्ली विधानसभा निवडणूक आणि बिहार विधानसभा निवडणूक पराभूत झालो होतो. देशात एक अस्थिर वातावरण होतं. अनेकांना वाटत होतं भाजपसाठी नकारात्मक वातावरण आहे. अनेक पक्ष भाजपविरुद्ध एकवटले होते. असे असतानाही भाऊ तोरसेकर यांनी मात्र भाजपला यश येईल हे सांगितले होते. (हेही वाचा, National Unemployment Day: पंतप्रधान मोदी यांचा बर्थडे ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा करा, विरोधी पक्षांचे अवाहन)
LIVE | श्री भाऊ तोरसेकर यांचे आपल्या यशस्वी पंतप्रधान मा. @narendramodi जी यांच्या कारकिर्दीवर संबोधन...
भाजपा महाराष्ट्र सेवा सप्ताह व्हर्च्युअल रॅली. विरोधी पक्षनेते श्री @Dev_Fadnavis, प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत. https://t.co/kAo41iccN8
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 18, 2020
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विधानसभा निवडणूक 2019 मध्येही भाऊ तोरसेकर यांनी भारतीय जनता पक्षाला दोन पर्याय दिले होते. या पर्यायात त्यांनी म्हटले होते की भाजप 150 की युती? पण आपण (भाजप) युतीचा मार्ग निवडला. नेमकी आपली हिच गोष्ट चुकली. नाहीतर भाऊ तोरसेकर यांचे तिसरेही विधानस सत्य ठरले असते. भाजप महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये स्वबळावर 150 जागा जिंकू शकला असता, असेही फडणवीस म्हणाले.