मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळातील नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा राजकीय प्रवास
Balasaheb Thorat | (Photo Credit: Facebook)

शिवसेना (Shivsena) अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारचा शपथविधी सोहळा आज, 28 नोव्हेंबर (गुरुवारी) सायंकाळी शिवाजी पार्क (Shivaji Park) वर येथे पार पडला. महाराष्ट्र सत्ता संघर्षातील ट्विस्ट अँड टर्न्स नंतर आज अखेरीस राज्याला आपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपात मिळाला आहे. यासोबतच आज महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच शिवसेना (Shivsena), कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) च्या सहा मंत्र्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. या सहा नेत्यांमधील एक महत्वाचे नवा म्हणजे काँग्रेसचे गटनेते, प्रदेशाध्यक्ष आणि आता नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात. शेतकरी आणि काँग्रेस या दोन गटांच्या वतीने महाराष्ट्राच्या राजकारणात थोरात यांचा सक्रिय सहभाग आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यापुढे मंत्रीमंडळात रोज होणार असणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात..

बाळासाहेब थोरात हे यंदाच्या म्हणजेच 14व्या विधानसभेत संगमनेर मतदारसंघातून (Sangamner Constituency) 1,25,380 मतांनी निवडून आले आहेत. विशेषसा म्हणजे यापूर्वी देखील थोरात यांनी याच मतदारसंघात तब्बल सहा वेळा विजयी पताका रोवली आहे, त्यामुळेच हा मतदारसंघ थोरात यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. संगमेनर आणि अकोले जिल्ह्यात त्यांनी तितकेच कामही केले आहे शैक्षणिक संस्थांची उभारणी केल्याने एकाअर्थी संगमनेरकरांच्या मनात थोरात यांच्यासाठी खास जागा आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकार मध्ये त्यांनी कृषिमंत्री, महसूल मंत्री म्हणून देखील जबाबदारी पार पाडली होती.

दरम्यान यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीआधी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक करण्यात आली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर ही मुख्य भूमिका कोण पार पडणार याबाबत औत्सुक्य होते, अशातच अहमदनगर काँग्रेस जिल्ह्यातील विखे पाटील यांच्या तोडीचे नेते बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती .

विधिमंडळ नेते पदाची धुरा हाती येताच थोरात यांनी अत्यंत सावधानतेने आपली सत्ता स्थापन करण्याचे काम केले, हा काळ महाराष्ट्र काँग्रेससाठी अत्यंत बिकट होता अगोदरच, मातब्बर नेते मंडळी काँग्रेसची कास सोडत असताना तसेच दुसरीकडे भाजप व शिवसेनेचे बळ वाढताना त्यांनी काँग्रेसची बाजू उचलून धरली. थोरात यांच्या नेतृत्वाने यंदाच्या निवडणुकीत अगदीच विखुरल्या गेलेल्या काँग्रेसला निदान तग धरून राहता येईल असे रूप प्राप्त करता आले