Union Minister Nitin Gadkari: नितीन गडकरी यांचे नातेवाईक असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक; डोंबिवली येथील दोन तोतयांना कर्नाटकमध्ये अटक
Arrest | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांचे नातेवाईक असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या दोन तोतयांना पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटक (Karnataka येथून त्यांना गुरुवारी अटक करण्यात आली. प्राप्त माहितीनुसाह हे दोघे बाप-लेक आहेत. प्राप्त माहितीनुसाह हे दोघेही डोंबिवली (Dombivli) येथील आहेत. आरोपी राजन गडकरी (वडील ) आणि त्याचा आनंद गडकरी (मुलगा ) हे दोघे आपण नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नातेवाईक असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करत असत.या दोघांनी पत्नी गीतांजली गडकरी यांना मागे ठेऊन कर्नाटकमध्ये पळ काढला होता.

वडील राजन गडकरी आणि त्यांचा मुलगा आनंद गडकरी हे दोघेही डोंबिवली पूर्व भागात राहतात. हे दोघेही मूळचे कर्नाटक राज्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी सांगितले की, या दोघांनी आपण केंद्रीय मंत्री गडकरी यांचे नातेवाईक असल्याचे सांगून जवळपास 10 लोकांकडून पैसे उकळले आहेत. या दोघांनी अनेकांना सरकारी नोकरी लावण्याचे आमिषही दाखवले. नोकरीच्या बदल्यात या तोतयांनी लोकांकडून रोख रक्कम गोळा केली. याशिवाय यांनी काहींना स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवूनही लूबाडले. (हेही वाचा, Aladdin Ka Chirag: 'अल्लाउद्दीनचा दिवा' दाखवून 2.5 कोटी रुपयांचा गंडा; पोलिसही चक्रावले, दोघांना अटक)

दरम्यान, या दोन्ही तोतयांची बनवेगिरी लोकांसोमर आली आणि पोलीस त्यांच्या मागे लागले तेव्हा त्यांनी कर्नाटकात पळ काढला. डोंबिवली येथील त्यांच्या घरात केवळ त्यांची पत्नी हजर होती. आनंद याची पत्नी गीतांजली यांच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, दोघेही सध्या घरात नाहीत. आपल्या 4 वर्षांच्या मुलालाही सोबत घेऊन ते बाहेर गेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे राजन आणि आनंद या दोघांनी गीतांजली यांच्या बँक खात्यातून सर्व व्यवहार केले आहेत.