building

Cities With The Most Billionaires: देशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) आता आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनली आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2024 (Hurun Global Rich List 2024) नुसार मुंबईत 92 अब्जाधीश राहतात. या बाबतीत मुंबई आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच मुंबईने बीजिंगला मागे टाकले आहे. देशाची राजधानी दिल्ली या यादीत 57 अब्जाधीशांसह 9व्या क्रमांकावर आहे. आता मुंबईच्या पुढे फक्त न्यूयॉर्क आणि लंडन उरले आहेत.

मुंबईची तुलना अनेकदा दुबईशी केली जाते. मात्र या यादीत प्रगतीचे प्रतीक बनलेल्या दुबई शहराचा पहिल्या दहामध्येही समावेश नाही. तेथे फक्त 21 अब्जाधीश राहतात आणि दुबई जगात 28 व्या क्रमांकावर आहे. चीनची अधिकृत राजधानी बीजिंगमध्ये 91 अब्जाधीश आहेत. चीनची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या शांघायमध्ये 87 अब्जाधीश आहेत. शांघाय स्टॉक एक्स्चेंज हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टॉक मार्केट आहे. या यादीत हे शहर पाचव्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा: Apple Jobs: ॲपल भारतामध्ये करणार बंपर नोकर भरती; पुढील तीन वर्षात पाच लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता_

सर्वाधिक अब्जाधीश असलेली शीर्ष 10 शहरे-  

न्यूयॉर्क- 119

लंडन- 97

मुंबई- 92

बीजिंग- 91 \

शांघाय- 87

शेनझेन- 84

हाँगकाँग- 65

मॉस्को- 59

नवी दिल्ली- 57

सॅन फ्रान्सिस्को- 52

सर्वाधिक अब्जाधीश असलेले शीर्ष 10 देश-

चीन- 814

अमेरिका- 800

भारत- 271

ब्रिटन- 146

जर्मनी- 140

स्वित्झर्लंड- 106

रशिया- 76

इटली- 69

फ्रान्स- 68

ब्राझील– 64

दरम्यान, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारतातील अब्जाधीशही या प्रवासात आपले पूर्ण योगदान देत आहेत. मुंबई हे फक्त देशातील सर्वाधिक अब्जाधीशांचे घरच नाही तर सर्वाधिक 5000 स्टार्टअपही याच शहरात आहेत. हे शहर नवीन लोकांनाही पुढे जाण्याची पूर्ण संधी देत आहे. त्या तुलनेत दुबईमध्ये केवळ 300 स्टार्टअप्स आहेत. मुंबईचा जीडीपी अंदाजे 310 अब्ज डॉलर्स इतका आहे.