Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार नाहीत; शरद पवार यांनी तसा कोणताही सल्ला दिला नाही- संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राजीनामा देणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री यांच्यात भेट झाली. मात्र, त्यांनी राजीनामा देण्याबाबत कोणताही सल्ला दिला नाही. उलट ही लढाई आपण शेवटपर्यंत लढायची यावर अधिक भर देण्यात आला, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांकडून राजीनाम्याबाबत चालवले जाणारे वृत्त धाधांत खोटे असल्याचेही संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधल्यानंतर संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत हे ठामपणे सांगताना संजय राऊत म्हणाले आम्हाला संधी मिळाली तर आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू. महाविकासआघाडीतल सर्व घटक पक्ष सोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील भेटून गेले आहेत. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे देखील वर्षा बंगल्यावर आले आहेत. त्यामुळे महाविकासआघाडी निश्चित एकत्र आहे. मुख्यमंत्री कोणत्याही स्थितीमध्ये राजीनामा देणार नाहीत. आम्ही आव्हानाला सामोरे जाऊ. (हेही वाचा, Nitin Deshmukh: एकनाथ शिंदे यांना धक्का; ती सही माझी नव्हेच; शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट)

दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्रातून मविआसरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील हे देखील गुवाहाटीला पोहोचले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत? याबाबतचा नक्की आकडा अद्यापही पुढे आला नाही. स्वत: एकनाथ शिंदे हे मात्र आपल्याकडे 40 पेक्षा अधिक आमदार सोबत असल्याचा दावा करत आहेत.