
CM Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यांचे हेलिकॉप्टर सातारा येथील दरे गावात उतरणार होते. मात्र, पाऊस आणि धुक्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर गावात उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे हे हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या देशने परत फिरवले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री तीन दिवसांसाठी सातारा (Eknath Shinde Satara Visit) जिल्ह्यातील त्यांच्या गावी जाणार आहेत. मात्र, अडथळा आल्याने दौऱ्यात ऐनवेळी बदल केला जाण्याची शक्यता आहे. एबीपी माझा या खासगी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
सातारा जिल्ह्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव आहे. ते आपल्या मूळ गावी अधूनमधून येत असतात. या वेळी दौऱ्यात ते गावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणार होते. ज्यामुळे हे शेतकरी स्वत: आपल्या शेतात बांबू लागवड करतील. मात्र, त्यांच्या दौऱ्यात ऐनवेळी बदल होण्याचा संभव आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे स्थान निर्मण केले आहे. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील नरे असले तरी त्यांनी आपली कार्यभूमी ठाणे केली आहे. ठाणे येथे एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे जेव्हा त्यांनी शिवसेना पक्षात बंड केले तेव्हा ठाणे शहर आणि जिल्ह्यातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.