Maharashtra Sadan Scam: 'ज्यांना कोर्टात जायचं त्यांनी खुशाल जावं'; मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळांना दोषमुक्त केल्यानंतर अंजली दमानियांच्या हायकोर्टात जाण्याच्या तयारीवर प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal | Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आज (9 सप्टेंबर) मुंबई सत्र न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामधून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणात त्यांच्यावर 8 गुन्हे आहेत. त्यापैकी 2 प्रकरणात त्यांना दोषमुक्तता मिळाली आहे. कोर्टाच्या या निकालानंतर भुजबळांनी आनंद व्यक्त करताना 'सत्य परेशान हो सकता पराजित नही' अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे सत्र न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर आता अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आपण हायकोर्टात दाद मागणार असल्याचं ट्वीट केले आहे यावर उत्तर देताना भुजबळांनी 'ज्यांना कोर्टात जायचं त्यांनी खुशाल जावं' असं त्यांनाही प्रत्युत्तर दिलं आहे. नक्की वाचा: Maharashtra Sadan Scam: मंत्री Chhagan Bhujbal, Pankaj Bhujbal, Sameer Bhujbal यांना Special Court कडून महाराष्ट्र सदन घोटाळ्यात क्लिन चीट.

छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन प्रकरणात 2 वर्ष तुरूंगवासदेखील भोगला आहे. मात्र या सार्‍या प्रकरणात मला कोणाच्याबद्दल मनात राग नाही असं म्हणत आता पुढे जायचं आहे असं म्हटलं आहे. तुरूंगात जाण्याचं दु:ख होतंच पण हे कितीवेळ उगाळत बसणार असे त्यांनी म्हटलं आहे.

याचिकाकर्ते अंजली दमानिया ट्वीट

 

ANI Tweet  

मुंबई सत्र न्यायलयाच्या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानले आहेत. अशा परिस्थितीतही माझ्यावर विश्वास ठेवून महाविकास आघाडी सरकार मध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिले त्याबाबत आभार मानले आहेत. दरम्यान महाविकास आघाडी सरकार आहे म्हणून माझी निर्दोष मुक्तता झालेली नाही तर वकिलांच्या मेहनतीमुळे निर्दोष सुटलो आहे असे देखील त्यांनी म्हटलं आहे.

सध्या महाविकास आघाडीमधील देखील अनेक मंत्र्यांच्या मागे ईडी कारवाईचा ससेमिरा लावण्यात आला आहे. पण त्यांचा 'भुजबळ' होईल अशी धमकी देणार्‍यांना सुनावताना त्यांनाही न्यायदेवतेकडून माझ्याप्रमाणेच दिलासा मिळेल असे ते म्हणाले आहेत. अजूनही काही लोक मला शांतपणे झोपू देणार नाहीत हे देखील त्यांनी नमूद केले आहे.