प्रॉपर्टीसाठी 80 वर्षीय महिलेला किडनॅप (Kidnap) करून ठेवल्याच्या आणि तिच्या 44 वर्षीय मुलाचा खून (Murder) केल्याच्या आरोपाखाली 5 जणांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यामधील मुख्य आरोपी हा महिलेच्या जवळच्या नात्यातील व्यक्ती असल्याची माहिती देण्यात आली आहे. चेंबूर पोलिस स्टेशनच्या टीम कडून मंगळवारी संध्याकाळी या महिलेला पवई येथील फ्लॅट मधून सोडवल्याचं सांगण्यात आलं आहे. या महिलेच्या बहिणीने माय- लेक 15 दिवसांपासून गायब असलेल्या घटनेनंतर 21 एप्रिलला पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांनी पहिल्यांदा मुलाशी शेवटचं बोलणं झालेल्या दोन जणांना वडाळा, पवई मधून ताब्यात घेतलं. पोलिस चौकशी मध्ये त्यांनी विशालचा 5 एप्रिलला खून केल्याचं कबूल केलं. पवई मध्ये त्याच्या आईला डांबून ठेवल्याचं सांगितलं. मुख्य आरोपीने अन्य 4 जणांना विशालच्या खूनाची सुपारी दिली होती. त्यानंतर त्याची आई आणि मुलाची प्रॉपर्टी विकण्याचे काम दिले होते. नक्की वाचा: Nashik Kidnapping Case: नाशिकमधील उद्योजकाच्या 12 वर्षीय मुलाचे अपहरण; काही तासातचं झाली मुलाची सुटका .
पहा ट्वीट
Maharashtra | An 80-year-old woman named Rohini Kamble was kidnapped & her 44-year-old son named Vishal was killed for property, a complaint was lodged by a family member on April 21st after the mother-son duo were missing for 15 days. About 7 people were accused in this matter.…
— ANI (@ANI) May 4, 2023
आई आणि मुलाला पनवेलला प्रॉपर्टीच्या डिलसाठी बोलावण्यात आले होते. तेथून त्यांचं अपहरण झालं. महिलेला कैद ठेवलेलं असताना तिला गुंगीची औषधं दिली असल्याचंही त्याने कबूल केले आहे.
आरोपीने महिलेची मालमत्ता विकण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. विशालची हत्या कशी झाली हे स्पष्ट झाले नाही. त्याचा पुढील तपास सुरू आहे.