Kidnapping | (File Image)

Nashik Kidnapping Case: नाशिक (Nashik) जिल्ह्यात एका 12 वर्षीय मुलाचे अपहरण (Kidnapping) करण्यात आले होते, परंतु नंतर अपहरणकर्त्यांनी त्याची सुटका केली. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सिन्नरच्या काळेवाडा भागात गुरुवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली, त्यावेळी हा मुलगा इतर मुलांसोबत खेळत होता. काळ्या कपड्यातील काही लोकांनी मुलाला त्यांच्या कारमध्ये बसण्यास भाग पाडले. ज्यावर इतर मुलांनी आवाज केला आणि त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी कारचा पाठलाग केला. या सर्व प्रकारानंतर मुलाच्या वडिलांनी सिन्नर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस सतर्क झाले आणि अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाला वाचवण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागात चेकपोस्ट उभारण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, सुमारे सात तास ओलीस ठेवल्यानंतर अपहरणकर्त्यांनी पहाटे दीडच्या सुमारास मुलाला त्याच्या घराजवळ सोडून पळ काढला. पीडित मुलाने सांगितले की, त्याला कारमध्ये बसवून कोपडी परिसरात नेण्यात आले आणि त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. दुचाकीने बारागाव पिंपरी शिवारात नेले व नंतर ते लोक निघून गेल्याचे त्याने सांगितले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा - Pune: पुण्यात अवघ्या 400 ग्रॅम वजन असणाऱ्या 6 महिन्यांच्या चिमुरडीचा जन्म, सर्वात कमी वजनाची लहान मुलगी म्हणून केला विक्रम)

अपहरणकर्त्यांनी केली होती खंडणीची मागणी-

प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अपहरण झालेल्या मुलाचे वडील नाशिकचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. काल सायंकाळी अपहरणाची बातमी पसरताच संपूर्ण परिसरात घबराट पसरली. मुलांचे नातेवाइकांनी आरडाओरडा सुरू केला. त्याचवेळी काही वेळाने अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना फोन करून खंडणीची मागणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरेवाडी परिसरातून हा फोन करण्यात आला होता. यानंतर अपहरणकर्त्यांनी मोबाईल बंद केला होता.

माहिती मिळताच पोलीस तातडीने सक्रिय झाले आणि मुलाच्या शोधात नाकाबंदी सुरू केली. शहरातून पळून जाण्यात अपहरणकर्त्यांना यश आले नाही, पोलिसांच्या धाकाने अपहरणकर्त्यांनी मुलाला त्याच्या घरासमोर सोडून पाच तासांतच पळ काढला. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपहरणकर्त्यांचा मोबाईल बंद असल्याने आणि वाहनावर नंबर प्लेट नसल्याने त्यांचे लोकेशन ट्रेस करण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या.