भीम आर्मी संघाचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची मुंबईतील सभा रद्द झाली आहे. तर पुण्यातही आझाद यांना जाण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आझाद हे प्रथमच महाराष्ट्रात दौऱ्यावर आले असल्याने त्यांनी विविध ठिकाणी सभेचे आयोजन केले होते.
चंद्रशेखर आझाद यांची प्रथम सभा शनिवारी वरळी येथील जांभोरी मैदानावर संध्याकाळी 4 वाजता होणार होती. परंतु वरळी पोलिसांनी त्यांना सभेसाठी परवानगी दिली नाही. मात्र तरीही सभा होणार असल्याचे भीम आर्मीने जाहीर केले होते. चंद्रशेखर आझाद हे मालाड मधील मनाली या हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी पोलिसांनी आझाद यांना गाठून अज्ञात स्थळी घेऊन गेले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना एका रुममध्ये बंद करुन ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण येणारी निवडणुक सरकारला महागात पडेल असा इशारा आझाद यांच्याकडून देण्यात आला आहे.(हेही वाचा- भीमा-कोरेगाव येथील विजयानिमित्त 'भीम आर्मी'ची पुण्यात महासभा; चंद्रशेखर आझाद यांची उपस्थिती)
या प्रकरणी आझाद यांना मुंबई पोलीस विमानात बसबून देणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान सर्व पोलिस स्टेशनांवर हायअलर्ट ठेवण्यात आला आहे. तसेच मनाली हॉटेलच्या 500 किमी अंतरावर पोलिसांनी जमावबंदी केली आहे.