Central Line Delayed Due to Technical Glitch (Photo Credits: File Photo)

मुंबईमध्ये आज मध्य रेल्वेची  (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे. विठ्ठलवाडी ते कल्याण स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे सीएसटीएमकडे जाणार्‍या मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. त्याचा परिणाम नोकरी, धंद्यासाठी बाहेर पडलेल्या सामान्यांना होत आहे. मुंबईकडे जाणार्‍या ट्रेन्सचं वेळापत्रक ऐन पीक अव्हर्समध्ये बिघडल्याने रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. कल्याण - विठ्ठलवाडी दरम्यान ट्रेन्स एकामागे एक रखडल्याने प्रचंड गर्दी झाली आहे. आता मध्य रेल्वेने या गर्दीवर मार्ग काढण्यासाठी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली; विठ्ठलवाडी ते कल्याण स्थानकादरम्यान तांत्रिक दोष

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ ते कर्जत/ खोपोली दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. तर कल्याण/ डोंबिवली/ ठाणे स्थानकांमधून गर्दी कमी करण्यासाठी विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. कुर्ला स्थानकाजवळ मध्य आणि हार्बर मार्गाच्या लोकलवर दगडफेक, पाच जण जखमी; स्थनिक टोळ्यांवर संशय

Central Railway Tweet  

सध्या मुंबईमध्ये मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी प्रयत्न करत आहे. आज सकाळी ओव्हर हेड इलेक्ट्रिसिटीमध्ये दोष आढळल्याने ट्रेन्सचं वेळापत्रक बिघडलं आहे.