 
                                                                 राज्यातील सरकारी रुग्णालयातील (Government Hospital) नवजात बालकाची चोरी, डॉक्टरांच्या निष्काळजीपणा, डॉक्टरांवर होणारे हल्ले यांसारख्या अनेक प्रश्नावंर तोडगा काढण्यासाठी राज्यातील 498 सरकारी रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे(CCTV) बसविण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. ह्या कामासाठी 4 कोटी इतका खर्च होणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. विशेष म्हणजे या कॅमेऱ्यांमध्ये मायक्रोफोन लावण्यात येणार असल्याने रुग्णालयातील अनागोंदी कारभार रुग्णालय प्रशासन आणि रुग व त्यांच्या कुटूंबातील वाद यांचा संपूर्ण संवादाचे रेकॉर्डिंगही होणार असल्याचे सांगण्यात येतय.
सरकारी रुग्णालयात डॉक्टरांना मारल्याच्या घटना, तसेच बालकाची चोरीची घटना आणि अन्य ब-याच घटना सतत ऐकायला मिळत असतात. वारंवार होणा-या ह्या घटनांना आळा बसावा यासाठी मुंबईतील 498 प्रमुख सरकारी रुग्णालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे.
पवईतील हिरानंदानी रुग्णालयाला आठ लाखांचा दंड, खंडपीठाने दिला निर्णय
आरोग्य विभागाच्या 498 सरकारी रुग्णालयांमध्ये एकूण 1360 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. ह्या संपूर्ण प्रक्रियेसाठी 4 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. रुग्णालयातील गुन्हेगारीच्या घटना आणि रुग्णालयाची सुरक्षा ह्यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर ह्या माध्यमातून प्रकाश टाकला जाईल, असे अधिका-यांकडून सांगण्यात येतय.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
