
Mumbai News: मुंबईतील भांडूप येथील रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. बाळ सारखं रडत असल्यामुळे 3 नर्सेसने बाळाच्या तोंडाला चिकपट्टी लावली आहे. या खळबळजनक घटनेने मुंबई महानगर पालिकेने कारवाई केली आहे. तिन्ही नर्सेंसच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रिया कांबळे असं पीडित बाळाच्या आईचे नाव आहे.( हेही वाचा- नर्स असल्याचे भासवून एक दिवसाचे बाळ बॅगेत घेऊन गेली पळून
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियाने 20 मे 2023 रोजी बाळाला जन्म दिला होता त्यानंतर बाळाचे स्वास्थ ठिक नसल्यामुळे भांडूप येथील पालिका रुग्णालयात उपाचार करण्यासाठी घेऊन आली. 31 मे 2023 रोजी बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बाळाला डिस्चार्ज मिळाला आणि प्रियाने 2 जून 2023 रोजी बाळाला पाहिले. त्यावेळी बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याचं प्रिया यांच्या निदर्शनास आलं. बाळाच्या अंगाला हनुवटीला, मानेला चिकटपट्टी लावल्याचं दिसून आले. प्रियाने सर्व चिकटपट्टी काढली. या चिकटपट्टीमुळे बाळाच्या अंगावर पुरळ देखील आली होती.
या घटनेचा जाब विचारण्यासाठी नर्सेला प्रियाने विचारलं होते परंतु त्यांनी उलट उत्तरे देऊन प्रियाशी अरेरावी केली. बाळ सतत रडत असल्यामुळे चिकटपट्टी लावली त्यात काही नवीन नाही. उगाच गोंधळ घालू नका असं उत्तर दिले. या घटनेची माहिती प्रियाने संपुर्ण कुटुंबियाना दिली. याचा जाब देखील स्थानिक नगरसेवकांनी विचारला होता. प्रियाने या घटनेची माहिती एका वकिलाला दिली. यांनी याबाबत मराराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली. या प्रकरणी लक्ष घालत आयोगाने मुंबई महापालिका आणि पोलिसांना याबाबत समन्स पाठवलं. पोलिसांनी या समन्सची दखल घेत तीन नर्सविरोधात कारवाई केली.