Canadacha Raja | Instagram

अधिक मासातील निम्मा श्रावण सरत आला तशी आता गणेशोत्सवाची (Ganeshotsav)  धामधूम वाढली आहे. अनेक ठिकाणी गणेशमूर्त्यांवर शेवटचा हात फिरवला जात आहे. यंदा राजन खातू (Rajan Khatu) यांचा 27 वर्षीय लेक निखिल खातू (Nikhil Khatu) याने कॅनडाच्या राजाची (Canadacha Raja) देखील मूर्ती साकारली आहे. भारतातून कॅनडामध्ये 16 फूट उंच बाप्पाची मूर्ती पाठवण्यात आली आहे. खातूंकडे मुंबईतील अंधेरीचा राजा, फोर्टचा राजा यांच्या मूर्त्या असतात. पण यंदा पहिल्यांदाच त्यांनी 16 फूट उंचीचे मूर्ती साकारून सातासमुद्र पार पाठवली आहे.

राजन खातू यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा कलेचा वारसा लेक निखिल खातू सांभाळत आहे. ही खातू कुटुंबातील तिसरी पिढी आहे. खातूंकडून आतापर्यंत 6-8 फूटांच्या मूर्त्या परदेशामध्ये पाठवण्यात आल्या आहेत परंतू यंदा पहिल्यांदाच त्यांनी 16 फूटी मूर्ती पाठवली आहे.

मोठा पल्ला पार करून कॅनडामध्ये ही गणेशमूर्ती पाठवण्यासाठी खास पॅकेजिंग देखील करण्यात आल्याची माहिती निखिलने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना दिली आहे. वूडन प्लॅन्कचा वापर करण्यात आला आहे. एअरबॅग्सच्या सहाय्याने मूर्ती सुरक्षितपणे पॅक करण्यात आली आहे.

Blue Peacock Entertainment कडून या 16 फूटी गणेशमूर्ती साठी बुकिंग करण्यात आलं आहे. लालबाग वरून आज ही मूर्ती कॅनडाला पहाटे 6 च्या सुमारास फ्लॅट ट्रॅक कंटेनर मधून रवाना करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर त्याचं विसर्जन 20X20 च्या आर्टिफिशिअल पॉन्ड मध्ये केले जाईल. त्यासाठी पाण्यात सोडियम बायकार्बोनेट मिसळले जाईल म्हणजे ही POP मूर्ती विरघळण्यास मदत होईल. Shrimant Dagdusheth Ganpati 2023 Decoration: पुण्यात दगडूशेठचा गणपती यंदा विराजमान होणार अयोद्धेच्या राम मंदिर प्रतिकृतीमध्ये.

दरम्यान लालबागच्या राजाप्रमाणे हा कॅनडा राजा देखील राज बैठकीच्या मुद्रेत आहे. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर दिवशी आहे. त्यानंतर 10 दिवस सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.