Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

CM Eknath Shinde, Devendra Fadnavis Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेना (शिंदे गट), भाजप सरकारच्या मंत्रिमंडलाचा विस्तार लवकरच पार पडणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चांना उधान आल आहे. अर्थात शिवसेना, भाजप अथवा सरकारकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, प्रसारमाध्यमांनी खात्रिलायक सूत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तामध्ये मंत्रिमंडळविस्ताराचा दावा करण्यात आला आहे.

सत्ताधारी आमारांमध्ये मोठी नाराजी

विरोधकांकडून सातत्याने केला जाणारा सरकार कोसळण्याचा दावा आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यावरुन सत्ताधारी आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. ही नाराजी अशीच राहिली तर सत्ताधारी आमदारांचा नेतृत्वावरील विश्वास उढेल. तसेच, विरोधक याचे भांडवल करतील ज्यामुळे आगामी निवडणुकीत फटका बसू शकेल. त्यामुळे सावधगिरीची पावले टाकत मंत्रिमंडळाचा विस्तार होणे आवश्यक असल्याची चर्चा सरकारी गोटातच सुरु आहे. दरम्यान, अमित शाह यांच्यासोबत झालेल्या दिल्ली येथील बैठकीत यावरच उहापोह झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, Ajit Pawar On NCP Party Workers: 'कामं करा.. नाहीतर कानाखाली आवाज काढेन, पदं काढून घेईन', अजित पवार यांची कार्यकर्त्यांना तंबी)

कसा असेल विस्तार?

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असला तरी, तो अत्यंत छोटेखणी असणार असल्याचे समजते. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ 10 जणांना संधी मिळू शकेल. ज्यामध्ये भाजपचे सहा आणि एकनाथ शिंदे गटाच्या केवळ चार आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेता येईल. त्यातही पुढे गंमत अशी की भाजपचे चार आणि शिंदे गटाचे केवळ दोन कॅबिनेट असतील. उर्वरीत चार राज्यमंत्री असतील. बाकिच्या इंच्छुकांची बोळवण मंत्रिपदाच्या गाजराऐवजी केवळ महामंडळ देऊन केली जाणार असल्याचे समजते.

येत्या 19 जून रोजी शिवसेना वर्धापन दिन आहे. शिवसेनेतील अभूतपूर्व फूटीनंतर पार पडणारा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 19 जून पूर्वीच करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे समजते. शिवाय आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.