Accident (PC - File Photo)

Buldhana Bus Accident: बुलढाण्यात सकाळी एका खासगी बसचा (Private Bus) अपघात झाला आहे. बुलढाण्यात जुन्या मुंबई- पुणे - नागपूर महामार्गावर सुलतानपूर परिसरात बसचा भीषण अपघात झाला. बस चालकाला झोप आल्याने बसवरील नियत्रंण सुटलं. या घटनेत बस पलटी होऊन अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या बसमधीस सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये तीन जण गंभीर आहेत. ही बस पुण्याहून नागपूरकडे जात होती. सकाळच्या ७ च्या सुमारास हा अपघात झाला.

या बसमध्ये एकूण ३५ प्रवाशी होते. काल साई अमृत ट्रॅव्हल्सची बस पुण्याहून निघाली होती. नागपुरला जाण्यासाठी बुलढाण्यातील  मुंबई- पुणे - नागपूर महामार्गावरून प्रवास करत होती. सकाळी बस चालकाला बस चालवताना झोप लागली असताना बस अनियंत्रित झाली. सुरवातीला बस मोठ्या झाडाला धडकली आणि बसने पलटी घेतली. या अपघातात बस चालक गंभीर झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पोलीस आणि इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतले.

जखमी प्रवाशांना मदत करत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुलतानपुर येथील मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपाचारासाठी जखमींना दाखल केले आहे. पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे घेवून जाणार आहे.