
Wall Collapse In Airoli: नवी मुंबईतील ऐरोली (Airoli) येथील एका निवासी सोसायटीची सीमा भिंत (Boundary Wall) गुरुवारी पहाटे कोसळली. सेक्टर 20 मधील शिवप्रसाद सोसायटीमध्ये ही घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची तक्रार नवी मुंबई महानगरपालिकेला (एनएमसी) देण्यात आली. त्यानंतर स्थानिक नागरी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, एनएमसी वॉर्ड अधिकारी सुनील कथोले यांनी सांगितले की, या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तथापी, कारवाईसाठी महापालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्यात आला आहे. आम्ही जबाबदार असलेल्यांना नोटीस बजावली असून आयुक्तांना अहवाल सादर केला आहे.
ऐरोलीमध्ये निवासी इमारतीची सीमा भिंत कोसळली -
नवी मुंबई के ऐरोली सेक्टर 20 मे दीवार गिरने से बड़ा हादसा...CCTV में कैद हुई घटना pic.twitter.com/eDd5Pfv3Re
— Gaurav Kumar (@gaurav1307kumar) July 3, 2025
दरम्यान, ही घटना इमारतीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. या व्हिडिओमध्ये, ग्रिल लावलेली सोसायटीची भिंत अचानक दुसऱ्या बाजूला कोसळताना दिसत आहे. तथापी, व्हिडिओमध्ये इमारतीतील पार्क केलेल्या दुचाकी भिंतीसोबत खोड खड्ड्यात कोसळताना दिसत आहेत.