(Photo Credits: Twitter/ ANI)

बोरीवली (Borivali) जवळील उड्डाणपुलाखाली पार्क केलेल्या  बेवारस गाड्यांनी शुक्रवारी सकाळी अचानक पेट घेतला. यामुळे काही वेळासाठी धुराचे काळे लोट परिसरात उसळत होते. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र या मध्ये गाड्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे.  बोरीवलीच्या हायवेजवळ असलेल्या उड्डाणपुला खाली अनधिकृत रित्या अनेक बेवारस गाड्या पार्क केलेल्या असतात. मात्र आजवर त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नव्हती.

ANI ट्विट

सुदैवाने आगेमुळे कोणतीही जीवितहानी झालीनासून तूर्तास आगीला नियंत्रणा खाली आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.