प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्विटर)

देशात जर एखाद्या गोष्टीवर विरोध करत आक्रम पवित्रा घेण्याचा अधिकार व्यक्तीला आहे. तर भारत हा लोकशाहीप्रधान देश असल्यामुळे एखाद्या व्यक्तीवर कोणत्याही गोष्टीबद्दल बंदी घालणे चुकीचे आहे. त्यामुळेच जर दूध उत्पादकांनी आंदोलन करत दूध रस्त्यावर फेकण्याचा त्यांना हक्क असल्याचे  मुंबई हायकोर्टाने सांगितले आहे.

काही महिन्यांपूर्वी दूध उत्पादकांनी आंदोलन करत रस्त्यावर लाखो लीटर दूध रस्त्यावर फेकून दिले होते. त्यामुळे उत्पादकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे 23 ऑगस्ट 2018 रोजी हायकोर्टाला एक पत्र लिहिण्यात आले होते. त्यानंतर या पत्राचे याचिकेमध्ये रुपांतर झाल्यानंतर यावर सुनावणी सुद्धा झाली होती.(मुंबई मधील 50 % शाळांमध्ये डब्बावाल्यांना नो एंट्री!)

मात्र दूधाला हवे त्या योग्यतेने हमीभाव मिळत नसल्याचे उत्पादकांनी केलेले हे आंदोलन केले होते. त्यामुळे सरकारचे लक्ष सामान्य माणसाकडे वेधून घेण्यासाठी त्यांनी असा पवित्रा घेतल्याने तो योग्य आाहे. त्याचसोबत एखाद्या व्यक्तीला न दुखावता स्वत:च्या मालमत्तेचे नुकसान करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. परंतु दूध उत्पादकांनीसुद्धा आपण अन्नपदार्थाची नासाडी करत असल्याचे लक्षात ठेवावे असे सुद्धा सांगितले आहे.