Airport Representational Image (Photo Credits: ANI)

Bomb Threat for Pune Airport: पुणे विमानतळ बॉम्बने (Bomb) उडवून टाकेल अशी धमकी देणारी वृध्द महिला पोलीसांच्या अटकेत आहे. पुणे विमानतळ उडवून टाकेल अशी धमकी दिल्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला आहे.  नीली कृपलानी असं या महिलेचे नाव आहे. गुरुवारी पुणे विमानतळावर आलेली नीला सुरक्षा कर्मचारीने तपासणीच्या वेळी हे भाष्य उच्चारलं.वैतागल्यानं या महिलेनं आपल्या शरिरावर बॉम्बने असल्याचे उच्चारण केल्यामुळे विमानतळावर मोठी गडबड झाली.

तिने विमानतळावरील बूथमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलिसांना 'मेरे चारों तरफ बम लगा है' असं सांगितलं. त्यामुळं तेथील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची झडती घेतली असता ती अफवा असल्याचं स्पष्ट झाले.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासणीच्या वेळीस सुरक्षा कर्मचारी वेळ लावत असल्यामुळे सदर महिलेने मेरे चारो ओर बॉम्ब है असं उच्चारण केलं. रागाच्या भरात केलेले उच्चारण तीला महागात पडलं.

पुणे पोलीसांना या महिलेला ताब्यात घेतले असून तीच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तिला कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. आर. करपे करीत आहेत. सदर महिला दिल्लीतील रहिवासी आहे.