BMC To Fine Without Mask: मुंबईकरांनो तोंडावर मास्क नसल्यास महापालिका ठोठावणार 200 रुपयांचा दंड, कारवाईला आजपासून सुरुवात
Representational Image | (Photo Credits: IANS)

मुंबईकरांनो जर तुम्ही घराबाहेर पडताना तोंडाला मास्क न लावता जात असल्यास तर जरा सावधच रहा. कारण आजपासून महापालिकेकडून ज्या नागरिकांच्या तोंडावर मास्क घातलेल्या दिसणार नाही त्यांच्यावर कारवाई करत 200 रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला जाणार आहे. या नव्या नियमानुसार प्रत्येक वॉर्डमध्ये 10-15 अधिकारी नेमण्यात येणार असून दंडाची रक्कम 1 हजारांवरुन 200 रुपये करण्यात आली आहे. आम्हाला दंडात्मक कारवाई करायची नाही आहे. पण नागरिकांनी घराबाहेर असताना मास्क का घालावा यासंदर्भात जनजागृती करायची असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकानी यांनी म्हटले आहे.(CM Uddhav Thackeray Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला जनतेशी संवाद; पहा भाषणातले महत्त्वाचे मुद्दे)

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या गणपती विसर्जनानंतर एकदम अचानक कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर घरोघरी जाऊन सर्वे किंवा चाचणी करण्यापेक्षा कन्टेंटमेंट झोनमधील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल दररोज जाणून घेतले जाते. याचसोबत खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांना ऑक्सिजनचा नियमित पुरवठा केला जातो की नाही ते सुद्धा पाहिले जात असल्याचे काकानी यांनी म्हटले आहे.

तसेच महापालिकेने My Family, My Responsibility कॅम्पेनचे लॉन्चिंग येत्या 15 सप्टेंबरला करणार आहे. यामधून कोरोनाच्या संदर्भातील प्रत्येक माहिती आणि काळजी कशी घ्याल याबद्दल सांगितले जाणार आहे. घरातील परिवाराने खासकरुन लहान मुल आणि वृद्धांकडे अधिक लक्ष द्यावे. तसेच खाताना एकमेकांच्या बाजूला बसा. पण एकत्रित जमून गर्दी करु नका असे महापालिकेने म्हटले आहे. त्याचसोबत घराबाहेरुन आल्यानंतर किंवा अंघोळीनंतर कशा प्रकारे कपडे धुवावेत याबद्दल सुद्धा सुचना दिल्या आहेत.(Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 184 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण तर 4 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू)

नागरिकांनी बस मधून प्रवास करताना सहकारी प्रवाश्यासोबत कारणाशिवाय बोलण्याचे टाळावे असे ही महापालिकेने म्हटले आहे. कॉर्पोरेट ऑफिसेसाठी मर्यादित कर्मचाऱ्यांना कामावर बोलवाले अशा सुचना देण्यात आल्या आहेत. पण त्यावेळी वातानुकूलिन यंत्रणेचा वापर करु नये असे स्पष्ट केले आहे. खिडक्या उघड्या ठेवण्यासह दोन कर्मचाऱ्यांमध्ये अंतर ठेवावे.