BMC Notice to Shopping Malls: अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 29 शॉपिंग मॉल्सला महापालिकेने धाडल्या नोटीसा
Malls | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

BMC Notice to Shopping Malls:  मुंबईतील शॉपिंग मॉल्सची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यामध्ये 29 मॉल्सने अग्निसुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने आढळून आले आहे. त्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेने नोटीसा धाडल्या असून अग्निसुरक्षिततेबद्दल लक्ष देण्याच्या सुचना दिल्या आहेत. तर मुंबईतील अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी असे म्हटले आहे की, या 29 मॉल्समध्ये लॉकडाऊन नंतर मॉल्स सुरु करण्याची परवानगी दिल्याने त्यांनी अग्निशमनसुरक्षिततेबद्दल नियमाचे अर्धवट पालन केले आहे.(Coronavirus: मुंबई-दिल्ली विमान, रेल्वे सेवा पुन्हा एकदा बंद होण्याची शक्यता, प्रस्ताव विचाराधीन असल्याची चर्चा)

 सदर 29 मॉल्सना J Form अंतर्गत नोटीसा धाडल्या असून त्यामध्ये सिटी सेंटर मॉल, सीआर2 मॉल (नरिमन पॉइंट), नक्षत्र मॉल (दादर), सबर्बिया मॉल (वांद्रे पश्चिम), ठाकूर शॉपिंग मॉल (कांदिवली) हायको मॉल (पवई) आणि ड्रिम्स द मॉल (भांडुप) यांचा समावेश आहे.दरम्यान, 23 ऑक्टोंबर रोजी नागपाडा मधील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या भीषण आगीत बहुतांश दुकाने जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाला तब्बल 56 तास लागले. याच कारणास्तव मुंबईतील मॉल्सची तपासणी करण्याचे निर्देशन देण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.(BMC School Closed Till December 31: मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा 31 डिसेंबर पर्यंत बंद; आयुक्तांचे आदेश)

या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 250 अग्निशमन दलाचे कर्मचारी, 228 वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल झाले होते. त्यामुळेच सिटी सेंटरला लागलेली आगीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र यामध्ये अग्निशमन दलाचे 6 जण जखमी झाले होते.