BMC School Closed Till December 31: मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा 31 डिसेंबर पर्यंत बंद; आयुक्तांचे आदेश
Schools | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई महापालिका शाळा (BMC Schools ) आता थेट पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये सुरु होणार आहेत. महापालिका आयुक्त आय एस चहल ( I S Chahal) यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व शाळा 31 डिसेंबर (BMC School Closed Till December 31) पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा या दिवाळीनंतर सुरु होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतू, आता थेट पुढच्याच वर्षी शाळा सुरु होणार असे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग येत्या सोमवार (23 नोव्हेंबर) पासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतू, दिवाळीनंतर दिल्लीची झालेली अवस्था पाहता मुंबई महापालिका सावध पावले टाकत आहे. त्यामुळे मुंबई शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संक्या पाहता सर्व शाळा येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा या बंदच ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत.

दरम्यान, शाळा सुरु करण्याबाबत तयारी आणि तशा हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या घेतल्या जात आहेत. मुंबई शहरातील अनेक शाळा कोविड सेंटर्स म्हणून वापरण्यात आली होती. त्यामुळे या सर्व शाला सॅनिटाईज करण्यात येत आहेत. यासोबतच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची वार्डनिहाय अँटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. (हेही वाचा, SSC, HSC Re-Exam 2020: दहावी, बारावी फेरपरीक्षांना आजपासून सुरुवात; परीक्षार्थींच्या संख्येत घट)

राज्यभरात अनलॉक करण्यात आल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगभरातही कोरोनाची दुसरी लाट अनेक ठिकाणी आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सतर्कता बाळगत शाळांबाबत निर्णय घेतला जात आहे.