Gauahar Khan: कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेत्री गौहर खान विरोधात गुन्हा दाखल
Gauahar Khan (Photo Credit: Twitter)

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) अडचणीत आली आहे.  कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे (COVID-19 Guidelines) उल्लंघन केल्याबद्दल गौहर खानविरोधात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने प्रत्येकाला आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांना मागे टाकत गौहर खान आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी घराबाहेर पडल्या. यामुळे बीएमसीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गौहर खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौहर खानला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे तिला होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, असे असतानाही ती चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी घराबाहेर पडली. विशेष म्हणजे, गौहर खान हिला कोरोनाची लागण झाल्यानंतर बीएमसीचे अधिकारी तिच्या घरी पोहचले होते. परंतु, ती घरात सापडली नसल्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुंबईचे डीएसपी चैतन्य एस म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Mumbai Night Curfew: मुंबईत नाईट कर्फ्यू बद्दल पुढील 48 तासात निर्णय घेतला जाणार, फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार- महापौर किशोरी पेडणेकर

एएनआयचे ट्वीट-

मुबंईत वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. याचपार्श्वभूमीवर नागरिकांनी तोंडावर मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि वारंवार हात स्वच्छ धुण्याचे सरकारकडून आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही काहीभागात कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महापालिका कठोर कारवाई करताना दिसत आहे.

मुंबईत काल (14 मार्च) 1 हजार 962 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 43 हजार 947 वर पोहचली आहे. यापैकी 3 लाख 17 हजार 579 कोरोनावर मात केली होती. तर, आतापर्यंत एकूण 11 हजार 531 जणांचा मृत्यू झाला आहे.