Blue Bottle Jellyfish in Mumbai: मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर 'ब्लू बॉटल जेलीफिश'; पर्यटन आणि गणोश विसर्जनादरम्यान काळजीची आवश्यकता
Blue Bottle Jellyfish | (Photo Credits: Pixabay)

मुंबईचे समुद्रकिनारे (Beaches of Mumbai) नेहमीच गर्दीने गजबजून गेलेले असतात. त्यातच आता गणेशोत्सवही (Ganeshotsav 2022) तोंडावर आल्याने ही गर्दी अधिकच वाढणार यात शंका नाही. दरम्यान, काहीशी काळजी घ्यावयास लावणारी बातमी पुढे आली आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर ब्लू बॉटल जेलिफिश (Blue Bottle Jellyfish) आढळून आले आहेत. माशांच्या धोकादायक प्रजातींपैकी ही एक प्रजाती असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर जेलीफीश आढळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पण, जेली फीश चावल्यास अथवा त्यांच्या संपर्कास आल्यास संबंधित व्यक्तींना विविध शारीरिक व्याधी आणि त्रासांना सामोरे जावे लागते. त्यामुळे काळजीचे अवाहन केले जात. दरम्यान, जुलै महिन्यात मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसात जुहू समुद्र किनाऱ्यावर जेलिफिश आणि टारबॉल

जेली फीश संसर्ग झाल्यास जळजळ होणं, श्वास घेण्यास अडचणी येणं, अशा समस्या उद्भवू शकतात. मुंबई महापालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी माहिती देताना म्हटले आहे की, मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर या आधीही अशाच प्रकारचे जेलीफीश आढळून आले आहेत. जेली फीश आढळले तरी घबरुन जाण्याचे अथवा चिंता करण्याचे कारण नाही. मुंबई महापालिका आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. ठिकठिकाणी स्वयंसेवकही आहेत. त्यांच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. पर्यटक आणि नागरिकांनीही थोडीशी काळजी घेणे आवश्यक आहे, असेही हर्षद काळे म्हणाले. (हेही वाचा, Blue Bottle Jellyfish: मुंबईकरांना सावध राहण्याचे आवाहन; जुहू बीचवर आढळले विषारी 'ब्लू बॉटल जेलीफिश'; जाणून घ्या डंख मारल्यास कशी घ्यावी काळजी)

अभ्यासक सांगतात की, माशांच्या विशारी प्रजातींमध्ये जेली फिश मोडतात. जेली फीशचा संपर्क झाल्यास गळा, घसा यांना सूज, हृदयरोग अथवा श्वसनास अडथळा असे गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे जेली फीशच्या संपर्कात येऊ नये यासाठी समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्यावी लागते. पूर्वी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर फारशी जेली फीश आडळत नसे. अलिकडील काही वर्षांंमध्ये मात्र हे प्रमाण नक्कीच वाढले आहे. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला पुढच्याच आठवड्यात गणेशोत्सव आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

ट्विट

जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसात जुहू समुद्र किनाऱ्यावर जेलिफिश आणि टारबॉल आढळून आले होते. त्यानंतर किनारी भागात लाईफगार्ड्स यांना तैनात करण्यात आलं होतं. या लाईफगार्ड्स यांना विषारी जेलिफिशपासून समुद्रकिनाऱ्याला आणि किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. जेलिफिशने डसल्यास त्यातून होणाऱ्या वेदना आणि त्रास हे प्रचंड असून यामुळे अनेक आजार होऊन जीवही जाण्याची भीती असते.