Mumbai Goa Highway Block: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई – गोवा महामार्गावर तीन दिवस चार तासांचे ब्लॉक
Photo Credits Pixabay

Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सलग तीन दिवस सकाळ आणि दुपारच्या सत्रात ब्लॉक घेतले जाणार आहेत. 11 जुलै ते 13 जुलै या तीन दिवसात हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 दोन टप्प्यात हे ब्लॉक घेतले जाणार आहे. कोलाड जवळील पूई येथे नवीन पूलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतला जाणार आहे. वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची वाहतूक अधिकसूचना जारी केली आहे.

पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. रंदीकरण पूर्ण झाले असले तरी कासू ते इंदापूर टप्प्यातील पूलांची कामे रखडली आहेत. ही कामे आता मार्गी लावली जाणार आहे. यासाठी सहा मोठे गर्डर आणण्यात आणण्यात आले आहेत. हे काम करतांना वाहतुक बंद ठेवणे गरजेचे असल्याने ठेकेदार तथा महामार्ग विभागामार्फत वाहतुक महासंचालकांकडे वाहतूक बंद ठेवणेबाबत विनंती करण्यात आली होती.

पर्यायी मार्ग 

  • वाकण पाली येथून वाहतूक भिसेखिंड, रोहा कोलाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर जाता येईल.
  • वाकण येथून महामार्गावरील वाहतूक पाली, रवाळजे, निजामपूर माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल.
  • या शिवाय खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल.

दरम्यान, याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याने अनेकांची गैरसोय होणार हे नक्की आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.